जनतेज न्युज

कोरोना लसीकरणाच्या नियोजनासाठी 4 डिसेंम्बरला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक 

प्रतिनिधी , ठाणे : जगासाठी महामारी ठरलेल्या करोना वर लस अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात लहान मुलांच्या लसीकरणासाठी असणाऱ्या टीम मार्फत या लसीकरणाचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या करोना योद्धा ( आरोग्य कर्मचारी) चा डाटा गोळा करण्यात आला आहे.  4 डिसेंम्बर रोजी ठाणे जिल्हाधिकार्यासमवेत या कमिटीची एकत्रित बैठक होणार असून या बैठकीत जिल्ह्यातील लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे. 
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईनवर लढणाऱ्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा यासाठी डाटा गोळा करण्यात आला आहे. रुटीन इम्युनायझेशनची म्हणजेच बालकांचे लसीकरणाचे नियोजन करणाऱ्या आयुक्तांच्या नेतृत्वाखालील उपायुक्त, रुग्णालयातील वरिष्ठ डॉकटर,  पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, एनजीओचे प्रतिनिधी, रोटरी क्लबचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या कमिटीमार्फतच ही लसीकरण मोहीम राबविली जाणार असून या कमिटीची आढावा बैठक 4 डिसेंम्बर रोजी ठाणे जील्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या बैठकीत प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार असल्यामुळे लस मिळण्याची आशा वाढली आहे.