सरकारकडून विलंब होत असल्यास महिलांनी आंदोलन करावे मनसे पाठीशी उभी राहील मनसे आमदार राजू पाटील
प्रतिनिधी , कल्याण : आठगाव ते कसारा दरम्यान चालत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करत तिला ढकलून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली असली तरी यानंतर प्रवासा दरम्यान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .यासंदर्भात बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील महिलांच्या सुरक्षेसाठी दिशा कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. कायद्याचा धाक असेल तर अशा गोष्टींना काही प्रमाणात आळा बसेल. राज्याचे गृहमंत्री या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आंध्रप्रदेशचा दौरा करून आल्याची आठवण देत या कायद्यानुसार गुन्हा घडल्यापासून 21 दिवसात गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार आरोपीला जन्मठेप, फाशी, सश्रम कारावास यासारख्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे . मात्र आरोपीला या कायद्यानुसार 21 दिवसात शिक्षा होत असल्यामुळे गुन्हेगारांना धाक राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत विधान सभेत चर्चा झाल्याप्रमाणे दिशा कायद्याची अमलबजावणी करन्याची मागनी केली आहे .स्त्रियांवर अन्याय होत असतान प्रत्येक तरुणीला स्त्रीला अत्याचाराला विरोध करणे शक्य नसते. यासाठीच दिशा कायद्याची अमलबजावणी केली जाणे गरजेचे असून जर कायद्याची अमलबजावणी करण्यास सरकार कडून विलंब होत असेल तर महिलांनी यासाठी उठाव करत सरकारला कायदा आणण्यास भाग पाडावे मनसे या आंदोलनात महिलांच्या बरोबर असेल असे आवाहन देखील त्यांनी महिलांना केले आहे .
