जनतेज न्युज

आईच बनली वैरीण… सव्वा महिन्याच्या राधिकाचा आईनेच केला खून.. आरोपी आईला पोलिसांनी केली अटक..

प्रतिनिधी , नारायण शीरगांवकर : तिसरीही मुलगी झाल्याच्या नैराश्यातून आईनेच सव्वा महिन्याच्या मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेने बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे बारामती तालुका पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केल्यानंतर हा खून आईनेच केला असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी दिपाली झगडे रा. काटेवाडी तालुका बारामती हिला आज सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे…
आरोपी दिपाली संदीप दगडे ही विवाहिता बाळंतपणासाठी माळेगाव येथील वडील संदीप जाधव यांच्या घरी आलेली होती.. स्वतःच सव्वा महिन्याच्या राधाला घराजवळील पाण्याच्या टाकीत टाकून तिचा खून केला.. मात्र मुलगी गायब झाली असल्याचा बनाव करीत माळेगांव पोलीसात वडील संजय जाधव यांनी दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती.. पोलिसांनी शोधाशोध केली असता घराजवळील पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह आढळून आला होता यानंतर पोलिसांनी लहान बाळाच्या खुनाचा आरोपी गजाआड करण्यासाठी कसून चौकशी सुरू केली होती.. यात अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई आईकडे गेली आणि पोलिसांनी कसून तपास केला असता सव्वा महिन्याच्या मुलीचा खून केल्याचे आईनेच केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.. यानुसार आज सायंकाळी तिला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे..