भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी च्या आचार्य तुषार भोसलेंचा शिवसेनेवर घणाघात
प्रतिनिधी , शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदु नकोय तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदु हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतिपाठातून मनःशांती मिळत नाही, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून, भजन किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे का सोडून द्यायला ? पण उद्धवजी धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेलं असतं पण तुमचं हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखं होतं, जे तुम्ही एक वर्षापूर्वीच काढून बाजूला ठेऊन दिलं. इतकं तकलादू हिंदुत्व शिवसेनेचं होतं हे आता महाराष्ट्रासमोर सिद्ध झालंय.
