प्रतिनिधी , नागपूर : नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, 10 लाख रुपये किमतीच 256 ग्राम एमडी ड्रग केलं जप्त , चार आरोपींना ठोकल्या बेड्या , नागपुरात एमडी ड्रग ची खेप पाठविली जात असून फुलसिंग पट्टी नावाचा व्यक्ती हे बैधनाथ चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला ला ड्रग सहित अटक केली त्याच्या सोबत इतर तीन जणांना सुद्धा अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहे
नागपुरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करी वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्या ओरमनात कारवाई सुद्धा होत असली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागपुरात ड्रग येते कुठून हा मोठा प्रश्न आहे
