प्रतिनिधी , अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 1 डिसेंबर 20 रोजी होणार आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाचही जिल्ह्यातील एकूण 77 मतदान केंद्रावर निवडणूक मतदान होणार असून या निवडणुकीत पुरुष 26060 आणि महिला 9562 असे एकूण 35622 शिक्षक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सर्वात जास्त मतदार अमरावती तर सर्वात कमी मतदान वाशीम जिल्ह्यात आहेत.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण 77 मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 348 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड19 च्या सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणी साठी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्यपथक नियुक्त करण्यात आले असून मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे.आज या निवडणुकच्या साहित्य चे वाटप करण्यात येत आहे
