जनतेज न्युज

सर्वच स्तरावर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले. खासदार भारतीताई पवार यांचे प्रतिपादन…

प्रतिनिधी ,नंदुरबार : महिलांवरील वाढते अत्याचार ,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा ,कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तुत्ववान असलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेची मोठे दुर्दैव आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर भारती पवार यांनी आज नंदुरबार येथील पत्रकार परिषदेत केले..
मराठा आरक्षणाबद्दल ठाकरे सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे सर्वोच्च न्यायालया सरकारला नीट बाजू न मांडता आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली .आता या सरकारने मराठा समाजाच्या शैक्षणिक आरक्षण देखील रद्द केले आहे .महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली परंतु प्रत्यक्षात बळीराजाला अतिशय तोकडी मदत या सरकारने दिली . या सरकारने मदत देण्यासाठी निव्वळ बहाने शोधले आहेत. तसेच गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही .दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत .हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही तीन महिन्याचा पगार न मिळाल्याने तीन एसटी कर्मचारी आत्महत्या केली आहे त्यानंतर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पॅकेज जाहीर केले .सामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले पाठवली गेली विज बिल माफ करण्याचे आश्वासन देऊनही सरकारने नियम पाळले नाहीत अशाप्रकारे ठाकरे सरकारने एक वर्ष वाया घालवले या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे मोजावे लागतील हे सरकार घरात बसून राज्यकारभार चालवते .मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दुःख हालअपेष्टा जाणून घेऊ शकत नाही हे सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले आहे. या सरकारने सत्तेत राहण्याचा अधिकार ग मला आहे असे खासदार भारतीताई पवार यांनी सांगितले…