जनतेज न्युज

भाजपची सत्ता जाऊनही ते सुधारायला तयार नाही; माजी आमदार अनिल गोटे यांचे वक्तव्य

प्रतिनिधी , महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये परीवर्तन होऊन वर्ष लोटले. मात्र अजुनही पोलीसांची चाटूगिरी काही संपुष्टात येत नाही. गेले वर्षभर शासकीय यंत्रणेत काही बदल होईल म्हणुन मी सुध्दा शांतपणे व समजुतदारपणे अधिका-यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, पण धुळे जिल्हयातील काही अधिका-यांची वर्तणुक ‘कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडीच’ आहे. अशी टीका धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात भाजपची सत्ता जाऊन वर्ष झाले आहे. मात्र भाजपाच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यातून ती हवा जात नाही आहे. जाणूनबुजून भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करीत आहे, तसेच आमचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष, कार्यकर्ते यांच्या घरावर, कार्यालयावर भ्याड हल्ले घडून आणले जात आहे. असा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.