प्रतिनिधी , दौंड : दौंड तालुक्यातील कासुर्डी मधील माळवाडी येथे बकरी चारण्याच्या कारणावरुन एकाचा खुन करण्यात आलाय,भिवा सिध्दु कोळपे अस खुन झालेल्या व्यक्तीच नाव आहे. यवत पोलीसांनी आरोपीला दोन तासात बेड्या ठोकल्यात,पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कासुर्डी मधील माळवाडी येथे भिवा सिध्दु कोळपे यांचा शेतामध्ये बकरी चारण्याच्या शुल्लक कारणावरुन चक्क दुचाकीवर डोके आपटुन खुन केलाय,सोमेश्वर बागुजी ठोंबरे अस या आरोपीच नाव आहे,याला यवत पोलीसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्यात,खुनाचा पुढील तपास यवत पोलीस करीत आहे.
