प्रतिनिधी , सांगली : शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्या घरी उदयनराजे महाराज यांची सदिच्छा भेट..रॅली काढून उदयनराजे यांचं स्वागत…
खासदार उदयनराजे भोसले (महाराज) यांनी अचानक सांगलीस मध्ये भेट दिली… शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्या घरी उदयनराजे महाराज यांनी सदिच्छा भेट दिली… रायगडवर शिवप्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुवर्ण सिहासनच्या संरक्षणसाठीच्या ‘खडापहारा योजनेची’ यावेळी उदयनराजे महाराज यांनी माहिती घेतली… तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यलयास पण त्यांनी भेट दिली… तसेच अरविंद दामले यांच्या मुलगीच्या लग्नास ही राजे यांनी उपस्थिती दिली. सुरुवातीला रॅली काढून उदयनराजे यांचं स्वागत करण्यात आले.
