जनतेज न्युज

मराठा समाजाला डावलून महावितरणाची भरती वागळे कार्यालयासमोर मराठा समाजाने नोंदविला निषेध

प्रतिनिधी , ठाणे : मराठा समाजाला महावितरण कंपनीने दिलेल्या आश्वासन आणि घुमजाव करीत वागळे कार्यालयात नौकरभर्ती प्रक्रिया राबविल्याच्या निषेधार्थ मराठा समाज कार्यकर्त्यांनी वागळे महावितरणच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन आणि निदर्शने केली. यापूर्वीच महावितरणने मराठा समाजाला वगळून निमशासकीय अस्थापणात भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर मराठा समाजाने लेखी निवेदन ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याना पाठविण्यात आले होते. त्याचा वेळोवेळी पाठपुरावा ही केला होता, मात्र सरकारने मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
मराठा समाजाला डावलून महावितरण कुठलीही अस्थापणेत भरती करणार नसल्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यासाठी वागळे महावितरण कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आल्याची माहिती मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली, मराठा समाजाच्या तरुणांवर हा अन्याय असून तो खपवून घेतला जाणार नाही. आज मराठा समाज शाततेत आंदोलन करीत आहे पण 8 डिसेंबर पर्यंत न्याय नाही भेटला तर आंदोलन वेगळे वळन घेईल असा इशाराही मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला