प्रतिनिधी , कोलापूर : महावितरण मध्ये मराठा समाजाला डावलून नोकर भरती सुरू असल्याचा आरोप करत आज राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. आज कोल्हापुरात देखील या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ताराबाई पार्कतील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला डावलून सुरू असलेली नोकरी त्वरित थांबवावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले, मात्र त्यांचा अंत पाहू नका आता मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आरपारची लढाई लढण्यास तयार आहे. असा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक दिलीप पाटील यांनी कोल्हापुरात दिला. यावेळी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
