प्रतिनिधी , सांगली : सहायक कामगार आयुक्त आणि स्टाफ हे बेकायदेशीर काम करत आहेत.. त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज बांधकाम कामगार संघटनेचे वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बेकायदेशीर नोंदणीचे कामकाज करणे आणि मंडळाने दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवून आपल्या कामगारांना त्रास देणे आणि त्यांना लाभापासून वंचित ठेवणेच काम सांगली कामगार आयुक्त आणि स्टाफ करत आहे.. याच निषेधार्थ आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले..
