जनतेज न्युज

तांत्रीकदृष्ट्या चुकून चूक झाली असेल तर त्या मताचे आम्ही नाही : आमदार गणेश नाईक

प्रतिनिधी , नवी मुंबई : आज भाजप नेते व आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात जाऊन भेट घेतली.नवी मुंबई कोविडं टेंस्टिंग सेंटर मध्ये 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल देण्याचा प्रकार उघडकीस आला होता, याप्रकरणी नवी मुंबई कोविडं टेस्टिंग सेंटरचे इन्चार्ज डॉक्टर सचिन नेमाने यांना निलंबित करण्यात आले होते याप्रकरणी कोणताही गैरप्रकार नसून तांत्रिक चूक असल्याचे नेमाने यांनी स्पष्टीकरण दिले होते गणेश नाईक यांनी आज आढावा बैठकीत हा विषय मांडला तसेच तांत्रिक दृष्ट्या किंवा चुकून झालेल्या चुकीची शिक्षा त्या व्यक्तीस द्यावी या मताचे आम्ही नाही मात्र जाणून-बुजून कोणताही हेतू मनात ठेवून ही कृती झाली असेल तर त्या लोकांवर कारवाई व्हावी असे मत गणेश नाईक यांनी आयुक्तांसमोर मांडले शिवाय व्हेंटिलेटर नियोजन योग्य पद्धतीने करावे, काही मुद्दा नाईक यांनी आयुक्तांसमोर मांडला तसेच सिरम या पुण्याच्या इन्स्टिट्यूटला पत्र देऊन लस आल्यावर योग्य त्या रीतीने विनामूल्य वाटावी व त्याचे योग्य नियोजन शहरात करावे असेही नाईक यांनी म्हटले कोरोना टेस्ट न केलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल येतो ही नवी मुंबई घडलेली देशातील पहिली घटना असेल त्यामुळे या प्रकरणी चौकशी करावी तसेच नालायक कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करावे।