प्रतिनिधी , बुलडाणा : जिल्ह्यातील टाकळी शिवार येथे 11 नोव्हेंबर रोजी हरिभाऊ पाटोळे यांचा मृतदेह डोके आणि हात, पाय तुटलेल्या अवस्थेत नाल्यामध्ये आढळून आला होता. या घटनेला 22 दिवस उलटून गेल्यावर वर ही अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.पाटोळे यांच्या हत्येचा तपासात निष्क्रिय असलेल्या ठाणेदाराला निलंबित करण्यात यावे आणि या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
