जनतेज न्युज

सोलापुरात सकल मराठा समाजाचं महावितरण कार्यालयासमोर आंदोलन…

प्रतिनिधी , सोलापूर : महावितरण नोकर भरतीमध्ये एस.ई.बी.सी.कोट्या अंतर्गत ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं अशा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या राज्य शासन मराठा आरक्षण स्थगितीचं करण देत पुढे ढकलत आहे.
मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केलेली असताना,
मराठा आरक्षण स्थगिती आणि कोरोनाचं कारण देत राज्य शासन वेळ मारून नेत आहे असा आरोपी सकल मराठा साजाकडून करण्यात आला आहे.
तयामुळे ज्या मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या महावितरणमध्ये अद्याप झालेल्या नाही आहेत,
अशा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी सकल मराठा समाज कडून आज सोलापूर जिल्हा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जर लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या महावितरणमध्ये नियुक्ती करण्यात नाही आली तर सकल मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.