प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ येथील दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद पदाधिकार्यांच्या बंगल्यामागील परिसरात मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (ता.2) उघडकीस आली. नातेवाइकांनी मृताचे कपडे ओळखले. मात्र, तो मृतदेह त्या व्यक्तीचा आहे की नाही, हे अजून स्पष्ट झाले नाही.
अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले. श्वानपथकालाही लगेच पाचारण करण्यात आले. श्वानाने दारव्हा मार्गावरील एका लॉजमागील बाजूपर्यंत माग काढला. लॉजच्या मागील बाजूस झाडाला गळफास लावून व्यक्तीने आत्महत्या केली. मृतदेह कुजल्याने केवळ कपडेच शिल्लक होते. तर श्वानांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे दिसून आले.
