प्रतिनिधी , जळगाव : फायनल मॅच च्या आधी सराव मॅच खेळली जाते तशी विकास आघाडीचे ही सराव मॅच होती महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या वेळेस एकत्र लढलो निकाल जर पाहिला जिथे जिथे भाजपचे उमेदवार होते तिथे तिथे महाविकासआघाडी ने घवघवीत यश मिळवले आहे जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे हे सरकार बरोबर काम करते मतदान करणारी लोक ही वेल क्वालिफाईड आहेत त्यांनीही एक्सेप्ट केलेला आहे की तीन चाकी रिक्षा ही ही जोरात चालती आहे आणि तिचं चौथ्यं चाक ही जनता आहे असे मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे
