जनतेज न्युज

कोर्टात गेल्यास गावातून बेधकल जातपंचायत ची दडपशाही

प्रतिनिधी , पुणे सासवड : मालमत्तेचा न्यायनिवाडा जात-पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे संबंधित जातपंचायतीने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केले आहे. त्याशिवाय वर्षांच्या आतमध्ये समाजात परत यायचे असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रूपये दंड रोख देण्याची आश्चर्यकारक मागणी जातपंचायतीने केली आहे. याप्रकरणी कोर्ट-कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी कुटुंबीयांना देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सासवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.सुरेश रतन बिनावत (वय 65), नंदू अत्राम रजपतू (वय 55), संपत पन्नालाल बिनावत (वय 56), मुन्ना रमेश कचरवत (वय 57), आनंद रामचंद्र बिनावत (वय 50), देवीदास राजू चव्हाण (वय 52), देवानंद राजू कुंभार (वय 51) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.