प्रतिनिधी , भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या देशात शेतकऱ्यांची भूमिका ही निश्चितच महत्वाची असते. केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाला पंजाब येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत पंजाब ते दिल्ली अशी पदयात्रा सुरू करून आंदोलन छेडले. या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी भाजपशासीत राज्यांनी शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे उडवले, त्यांच्या वाटेत वाळूचे ढीग लावले, ही आपल्या देशाची संस्कृती नाही. देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची कृषिप्रधान ही ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत परंतु शेतकऱ्यांचे म्हणणे देखील सध्या जाणून घेतले जात नाहीय हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे अशी माहिती खेड-दापोली विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
