प्रतिनिधी , जळगाव : बीएचआर’ घोटाळ्याचा पाठपुरावा करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाच्या पतसंस्थेतच ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दोन ठेविदारांसोबत आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा गौप्यस्फोट केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वरणगाव येथील दोन ठेविदार यादव जगन्नाथ पाटील (रा.तळवेल ता.भुसावळ) व प्रकाश रघुनाथ चौधरी (रा. राम पेठ, वरणगाव) या दोघांनी वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्थेत दामदुप्पट योजनेअंतर्गत यादव पाटील यांनी ९१ हजार ठेवले होते. तर त्यांचे सासरे ज्ञानदेव कीटकूल भंगाळे व नंदकुमार पाटील यांच्यावावर ६९, हजार १०० रुपये ठेवले होते. दरम्यान, एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्था ही दुसर्याच संचालकांनी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खडसे यांच्या नावामुळे खडसे यांनी ठेविदारांना न्याय मिळवू द्यावा अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
