दोन चारचाकी वाहना सह चार आरोपींना अटक
प्रतिनिधी , भंडारा : जवाहर नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबी नाका येथे पेट्रोलिंग करीत असताना 6 डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खरबी चेक पोस्ट येथे संशय आल्याने दोन चार चाकी वाहन अडवली असता त्यात एकूण दोन लाख 72 हजार तीनशे वीस रुपयाचा माल अवैधरित्या वाहतूक करताना पकडण्यात आला आहे. त्यावेळी दिपक शांताराम दुमाने वय 30 वर्षे रा. नगीनबाग चंद्रपूर, प्रशांत सदाशिव निंबाळकर वय 39 वर्षे रा. पठाणपुरा वार्ड क्रमांक 1 चंद्रपूर, अभय बाबुराव बनपूरकर वय 45 वर्षे रा. जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर, आशिष भाऊराव बडवाईक वय 30 वर्षे रा. नगिनाबाग सिस्टर कॉलनी चंद्रपूर यांच्याकडून मारुती सुझुकी कंपनीची अल्टो गाडी क्रमांक एम एच 34 /k 20 34 क्रमांकाची गाडी किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये किमतीची गाडी मारुती सुझुकी गाडी क्रमांक एम एच 34/AM -39 50 क्रमांकाची गाडी किंमत अंदाजे पाच लाख लाख रुपये व त्या गाडीमध्ये असलेला इंग्रजी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे . असा एकुण 2 लाख 72 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
