प्रतिनिधी , मुंबई : लॉकडाउन च्या काळात उद्यानं बंद असताना देखील उद्यानांमध्ये कामे केल्याचे दाखवून तब्बल 8 कोटी 40 लाख रुपयांचे बिल वसूल केल्याचा घोटाळा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असून यामधील दोषी अधिकारी व कंत्राटदाराला निलंबित करण्यात आलंय. या कारवाईत उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी यांना मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी निलंबित केलंय. तर दोन्ही ठेकेदारांचे ठेके रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.. यात येत्या 15 दिवसात 8 कोटी 34 लाख रुपये भरण्याचे आदेश संबंधित दोषी ठेकेदाराला देण्यात आलेत. एकूणच या घोटाळ्यामुळे नवी मुंबई मनपाची बदनामी तर झालेय मात्र आयुक्तांनी केलेल्या कारवाई मुळे सर्व अधिकारी व ठेकेदारांचे धाबे आता चांगलेच दणाणलेत.
