प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : दुचाकी ची चावी न दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला मारहाण करत तिच्या बोटाचा चावा घेत बोटच तोडल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीक मोहने येथेघडली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मद्यपि पती विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे
कल्याण नजीक मोहने येथे कबिर साबळे व त्याची पत्नी उज्वला आपल्या मुलांसह राहतात .कबीर याला दारूचे व्यसन जडले आहे .काल सकाळच्या सुमारास कबीर दारू पिऊन घरी आला त्याने उज्वला यांच्याकडे दुचाकीची चावी मागितली मात्र उज्वला यांनी चावी देण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या कबीरने उज्वल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली याच दरम्यान त्यांच्या मुलांनी उज्वल यांना सोडवण्याचा प्रयत्न केलं मात्र राग अनावर झालेल्या कबीरने उज्वला यांच्या बोटाचा चावा घेतला या मारहाणीत उज्वल यांचे बोट सुटले असून त्यांना दुखापत झाली आहे याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार मद्यपी कबीर साबळे विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे
