जनतेज न्युज

गेवराई तालुक्यातील 137 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत संपन्न

प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एकुण 137 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत गेवराई तहसील कार्यालयात पार पडले यामध्ये जिल्हाधिकारी बीड यांनी अधिसुचीत केल्यानुसार अनुसुचित जातीसाठी 17 अनुसुचित जमातीसाठी 2 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 37 व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 81 अशा एकुण 137 सरपंच पदासाठी महिला आरक्षणासह सोडत प्रक्रिया पार पडली. सदरील आरक्षण सोडत प्रक्रियेला तालुक्यातील नागरिकांसह नायब तहसीलदार जाधवर,हजारे,रामदासी पेशकार पाटील , खेडकर तहसील कर्मचार्यां सह पंचायत समिती बिडीओ अनिरुद्ध सानप उपस्थित होते.