जनतेज न्युज

गुरुकुंज मोझरीच्या राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन…

तिवस्यात विविध पक्ष व संघटनेचा रस्ताऱोखो..
प्रतिनिधी , अमरावती : आज संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांच्या समर्थनात पक्ष व विविध संघटनेच्या वतीने बंदचे आव्हान करण्यात आले होते या बंदला अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गुरुकुंज मोझरी येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ चक्का जाम आंदोलन केले तर तिवसा शहरात देखील विविध पक्ष्याच्या वतीने आंदोलना करण्यात आले यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
गेल्या दहा ते बारा दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर लाखोच्या संख्येने हरियाणा पंजाब येथील शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे या आंदोलनाची आग आता संपूर्ण भारतभर पेटत असून आज शहर व ग्रामीण भागात बंद पुकारून राष्ट्रीय महामार्गावर निषेध आंदोलन करण्यात आले तर गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर युवा संघर्ष संघटना व शेतकऱ्यांनी काहीवेळ महामार्ग रोखून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले यावेळी युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.