जनतेज न्युज

डोंबिवली सोनारपाडा परिसरात भंगाराच्या गोडावून ला आग

सात ते आठ गोडावून आगीच्या विळख्यात
आगीदरम्यान स्फोट
अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनांस्थळी दाखल

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवलीच्या कल्याण -शिळ रोडवर असणाऱ्या सोनारपाडा परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये आग लागून स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी आग लागल्यानंतर याठिकाणी स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहेत. या आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की डोंबिवलीच्या कोणत्याही परिसरातून धुराचे लोट दिसत आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत .आगीची तीव्रता पाहता स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.