जनतेज न्युज

जालना:भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसला,दोन सख्ख्या बहिनींचा जागीच मृत्यू ,

प्रतिनिधी , जालना : भरधाव कंटेनर घराच्या अंगणात घुसल्याने दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे.जालना जिल्ह्यातील सिंदखेडराजा रोडवरील नाव्हा गावच्या शिवारात ही घटना घडलीय.६ वर्षीय शाहीन शेख आणि १० वर्षीय सुमया शेख अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावं आहेत.आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास सिंदखेडराजाहुन जालनाकडे कंटेनर( क्रमांक एन एल ०२ के ८४६२) हाभरधाव वेगाने जात असताना कंटेनर चालकाचा अचानक ताबा सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणात खेळत असणाऱ्या मुलींच्या अंगावरून गेला.या अपघातात दोन्हीही मुली कंटेनरखाली चिरडल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत शेतकऱ्याच्या घराचंही नुकसान झालं आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.