जनतेज न्युज

लवकरच 6 हजार शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू : वर्षा गायकवाड

प्रतिनिधी , मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीव्दारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे ‘पवित्र’ शिक्षक भरती पुन्हा होणार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे 6 हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.