प्रतिनिधी , नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचं खळबळजनक प्रकरण आलं आहे. मुक्ता बोबडे असे सरन्यायाधीशांच्या आईचे नाव आहे. ते वयोवृद्ध आणि आजारी असल्याचा गैरफायदा घेत गैरअर्जदार तापाश घोष याने त्यांची फसवणूक केल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून त्या आधारे पोलिसांनी घोष नामक इसमाला अटक केली आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अतिशय गोपनीयतेने तपास करत आहेत
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबियांच्या वडिलोपार्जित स्थावर संपत्ती वर दहा वर्षांपूर्वी सिजन लॉन तयार करण्यात आले होते. या लॉनची देखभाल आणि इतर कामांकरिता तपस घोष नामक इसमाची व्यवस्थाप म्हणून नियुक्ती कारण्यात आली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई वृद्ध आणि आजारी असल्याने त्या या व्यवहाराकडे लक्ष देऊ शकत नसल्याने गैरअर्जदार घोष याने गैरफायदा घेऊन हिशोबात घोळ करायला सुरुवात केली होती. न्यायाधीश शरद बोबडे हे देखील व्यस्त असल्याने त्यांनी घोष वर विश्वास केला होता,मात्र गेल्या काही दिवसांपासून घोष यांनी केलेला घोळ लक्षात आल्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात घोष यांनी लॉनच्या किरायापोटी मिळणाऱ्या रकमेमध्ये बनावट पावत्या तयार करून रकमेमध्ये हेराफेरी करत केली फसवणूक केल्याचं उघड होताच रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे
प्रकरण हायप्रोफाईल असल्याने
फसवणूकीचे प्रकरण देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे याच्या कुटुंबाशी निगडित असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अतिशय बारकाईने तपास सुरू केला आहे. हिशोबातील प्रत्येक खर्च तपासाला जातो आहे,त्या आधारेच फसवणूकीची रक्कम ही सुरवातीच्या तपासत अडीच कोटी रुपये असल्याचं पुढे आले असल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
