प्रतिनिधी , सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बस्तवडे मध्ये डोंगर सपाटीकरण सुरू होते.. यावेळी रविवारी स्फोट झाला होता.. मध्ये दोन मयत झाले होते.. याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. यामध्ये जमिनीचे मालक, ठेकेदार सहित दोन मृतांचा ही गुन्हा दाखल झालेल्या मध्ये समावेश आहे..
बस्तवडे येथे रविवारी जमीन सपाटीकरण करत असताना कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन दोन ट्रक जळून खाक झाले होते… तर प्रतीक स्वामी आणि ईश्वर बामणे हे दोघे जण ठार झाले… यावेळी जमीन सपाटीकरण उत्खननाला परवानगी घेण्यात आली नव्हती… याठिकाणी भुसुरंगासाठी लागणारे जिलेटिन आणि डिटोनेटर याची ही परवानगी घेण्यात आली नव्हती.
