प्रतिनिधी , यवतमाळ : काम होत नाही, चकरा मारून थकलो’, असे म्हणत तरुणाने अंगावर रॉकेत ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घडली.
सुमित जयस्वाल (वय 30, रा. पुसद) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुण दुपारी उत्पादन शुल्क कार्यालयात आला. ‘माझे काम होत नाही, चकरा मारून थकलो आहे’, असे म्हणत ओरडत सुटला. उपस्थित कर्मचार्यांनी त्याला नेमके काय झाले, याबाबत विचारणा केली. पुसद येथे मल्लीशाम पल्लेवार व अरविंद नाईक यांचे परवानाधारक किरकोळ दारूविक्रीचे दुकान आहे. सदर दुकान सुमित व त्याचा सहकारी सतीश जयस्वाल यांच्या नावे करणार होते. मात्र, कार्यालयातून उशीर होत आहे, असे म्हणत पिशवीतून बिसलेरी बॉटलमध्ये आणलेले रॉकेल अंगावर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कर्मचार्यांनी समयसूचकता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दादासाहेब देवकते (वय 50) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सुमित जयस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
