जनतेज न्युज

जालना:शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर

प्रतिनिधी , जालना : जालना:शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वाभिमान सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून जालना जिल्ह्याला रक्ताच्या १ हजार बॉटल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली आहे.