प्रतिनिधी , मुंबई : कोरोना लस निर्मितीसाठी एकूण 5 कंपन्या काम करत आहेत. त्यांचे क्लिनिकल ट्रायलही पूर्ण झाले आहेत. आता कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीला परवानगी द्यायची हे केंद्राने ठरवायचं आहे. लसीकरणासाठी राज्यात एक की दोन कंपन्यांना परवानगी द्यायची हा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचंही टोपे म्हणाले. कोरोना लस आल्यानंतर सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु आहे. कालपर्यंत 90 हजार जणांची यादी तयार झाली आहे. आयएमएच्या माध्यमातून माहिती गोळा केली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
