जनतेज न्युज

संशयी वृत्तीमुळे संसारात विघ्ने; भरोसा सेलमध्ये 399 तक्रारी… 76 प्रकरणात घडवला समेट: वेगळे राहण्यावरून होताहेत वाद…

प्रतिनिधी , सातारा : संशयीवृत्तीमुळे संसारात विघ्ने येत आहेत. भरोसा सेलमध्ये मार्च ते आजपर्यंत 399 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 76 प्रकरणांमध्ये समेट घडवण्यात आला आहे.भादवी 498 नुसार 47 प्रकरणे पोलिसात दाखल झाले आहे.कौटुंबिक हिंसाचार 25 प्रकरण,कोर्ट समज 20 ,दप्तरी फाईल 66 आणि आता पर्यंत 232 तक्रारीचा निपटारा करण्यात आला आहे. पती, पत्नी एकमेकांवर संशय घेत असल्याने तसेच कुटुंबीयांच्या अवास्तव हस्तक्षेपामुळे वाद होत असल्याचे चित्र आहे. काही प्रकरणांमध्ये व्यसनही वादाचे कारण बनत आहे. मोठ्या शहरांमध्ये मोबाइलमुळे पतीपत्नींमध्ये वाद होत आहेत; मात्र बुलडाणा शहरात अजून तरी अशा तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. पत्नीची आई आणि बहीण यांचा संसारात वाढता हस्तक्षेपही पती- पत्नीमधील वादाचे कारण बनत आहे. पतीची बहीण आणि आईचाही हस्तक्षेप वाढत असल्याने पती-पत्नीत वितुष्ट येत आहे, तसेच आधुनिक काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती उदयास आली आहे. त्यामुळे सासू, सासऱ्यांबरोबर राहण्यास तयार नसल्यानेही वाद होत आहे.भरोसा सेलच्या प्रमुख अलका एपीआय निकाळजे यांच्या मार्गदर्शनात हे.कॉ.अलका वाघमारे आणि किरण साबळे तक्रारकत्त्याचे समुपदेशन करीत आहेत..