जनतेज न्युज

शरद पवार यांच्या नावे नेत्ररुग्ण धर्मशाळेचे राज्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधी , लातुर : लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे शरद पवार यांच्या नावाने नेत्ररूग्णालय धर्मशाळेचे भूमिपूजन करण्यात आलं.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. उदगीर येथील उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयात मोठ्या संख्येने नेत्र रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. मात्र यावेळी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची मोफत सोय करण्यासाठी उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्यावतीने ‘नेत्ररुग्ण धर्मशाळा’ उभारण्यात आहे. तसेच या धर्मशाळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरचंद्रजी पवार नेत्ररुग्ण धर्मशाळा’ असे नाव देण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नियोजित धर्मशाळेचे भूमिपूजन करण्यात आले. शरद पवार यांच्या पुढच्या वाढदिवसादिनी या नेत्ररूग्ण धर्मशाळेचे लोकार्पण करण्यात येईल असेही यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जाहीर केले.