जनतेज न्युज

वृद्ध आई – वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मच्याऱ्यांची तीस टक्के पगार कपात.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : वृद्ध आई – वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मच्याऱ्यांची तीस टक्के पगार कपात करून आई – वडिलांच्या खात्यावर पाठवण्याचा निर्णय घेणारी राज्यातील तीसरी उस्मानाबाद जिल्हा परिषद
वृध्द आई – वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मच्याऱ्यांची ३० टक्के पगार कपात करून त्या वृद्ध आई – वडीलांच्या बॅक खात्यावर जमा करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घेतला आहे . असा निर्णय घेणारी उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात तीसरी असुन यापुर्वी लातुर व अहमदनगर जिल्हा परिषदेणे हा निर्णय घेतला आहे .