जनतेज न्युज

महावितरण उपविभागीय कार्यालय हिमायतनगर अंतर्गत 05 कोटी 27 लाख रुपयांची विजबील थकीत.

प्रतिनिधी , हिमायतनगर : कोरोणा लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र परिश्रम करून महावितरण’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवून एक चांगली सुविधा सर्व विद्युत ग्राहकांना दिलीय.आज घडीस महावितरण उपविभागीय कार्यालय हिमायतनगर अंतर्गत हिमायतनगर शहरी व ग्रामीण आणि सरसम व इस्लापूर अशा चार शाखेमध्ये 05 कोटी 27 लाख रुपये विजबील थकबाकीचा आकडा एवढ्या मोठ्या प्रमाणत वाढलाय….
अक्षरशा महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे ही कंपनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत काम करते त्यामुळे ग्राहकाचा विद्युत पुरवठा न तोडता वसुली करत आहोत. अशी प्रतिक्रिया उपकार्यकारी अभियंता एन.डी. लोणे यांनी दिली.