प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे शिंदे मळ्यानजीक कॅनालशेजारील असणाऱ्या शेताजवळुन गेलेल्या विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन ऊसाच्या फडास आग लागली होती.. या आगीत तब्बल साडे दहा एकर ऊस जाळून खाक झाला आहे…त्यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे…आगीचे लोळ दिसु लागल्यानंतर शेतकऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला परंतु चोहोबाजुने फड पेटला होता… या आगीत शेतकऱ्यांचा गाळपास जाणारा ऊस जळाला आहे…. यामध्ये ईश्वर जोतीराम शिंदे, जोतीराम एकनाथ शिंदे, विजय जोतीराम शिंदे , अविनाश गोपाळ शिंदे , रघुनाथ विष्णू खोत , विलास विष्णू खोत , पांडुरंग विष्णू खोत , रावसाहेब विष्णू खोत ( प्रत्येकी २५ ) असा एकुण १० एकर २२ गुंठे ऊस जळाला आहे.. . याबाबत शेतकऱ्यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे…
