जनतेज न्युज

हिंगोलीत वंचितचे धरणे, दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा.

प्रतिनिधी , हिंगोली : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक रद्द करावे या मागणीसाठी दिल्ली येथे पंजाब व हरयाणा येथील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला अनेक राज्यातून विविध पक्ष संघटना पाठिंबा देत आहेत. हिंगोलीत देखील वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यासाठी वंचितच्या वतीने आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.