जनतेज न्युज

दैठणा पोलिसांनी राशनचा अवैध ५४७ पोते तांदूळ पकडला.

प्रतिनिधी , परभणी : अवैध तांदळाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्या नंतर दैठना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर यांनी गंगाखेड – परभणी रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या त्या ट्रकचा पाठलाग करून त्याला थांबवले आणि ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये २७ टन तांदूळ होता. राशनचा अवैध ५४७ पोते तांदूळ पकडला असून वाहतूक होत असलेला ट्रक ट्रक ताब्यात घेतलाय. महसूलच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर दिली.