प्रतिनिधी , भंडारा : भंडारा जिल्हयातील लाखांदुर तालुक्यातील ग्राम ओपारा परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर भंडारा स्थानीक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकुन तील लाख ५५ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच आरोपींना अटक केली.
पोलीसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातुन नगदी २०हजार २००रू,३१ हजार रूपये विंâमतीचे ०३ मोबाईल फोन, ३ लाख ३ हजार रूपये कीमतीच्या ७ मोटार सायकली व ईतर साहीत्य असा एकुण मिळुन ३ लाख ५५हजार ५० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला. पोलीसांनी जुगार खेळणा-या राजकुमार कन्हैलाल टहलानी वय ५२ वर्ष रा. लाखांदुर,योगेश देवाजी राऊत वय ३५ वर्ष रा. ओपारा ता. लाखांदुर,तुळशीदास रामदास मेश्राम वय ४० वर्ष रा. विरली,रवि कानिराम भांगडकर वय ३८वर्ष रा. ओपारा व मोहन मुखरन शेंडे वय ३७ वर्ष रा. ओपारा यांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द पोलीस स्टेशन लाखांदुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आह.
