प्रतिनिधी , बीड : बीडमध्ये हार्डवेअर प्लावूडच्या दुकानात केमिकलचा भीषण स्फोट झाल्यानं 1 ठार तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना बीड शहरातील जिजामाता चौक परिसरातील , महालक्ष्मी रुग्णालयाच्या शेजारी घडलीय.अनिरुद्र सर्जेराव पांचाळ वय 30 रा.सेलू ता.गेवराई असं मृतांचे नाव असून अन्य 2 जण जखमी झाले आहेत.
शहरातील चंपावती हार्डवेअरचे हे गोदाम आहे.या गोदामात प्लावूड , फायबर दरवाजे होते.याचाच काम करत असतांना केमिकलचा भीषण स्फोट झालाय.दरम्यान घटनास्थळी , पोलीस उपअधिक्षक स्वप्नील राठोड , शहर पोलिस ठाण्याचे पोनि. रवी सानप यांच्यासह आदींनी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.दरम्यान स्फोट कशामुळं झाला याचा तपास पोलीस घेत आहेत.
