जनतेज न्युज

केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.

प्रतिनिधी , धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीने आज धुळ्यात केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना दुसरीकडे मात्र केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्याचा जणू सपाटा लावला आहे असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.
पेट्रोल डिझेल दरवाढी मुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला असून भाजपच्या केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आरोप देखील यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीने पेट्रोल पंपावर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलना वेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.