जनतेज न्युज

बेकायदेशीर वृक्ष तोडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आत्मदहनाचा प्रयत्न.

प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरात करण्यात आलेल्या बेकायदेशीर वृक्ष तोडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने धुळे मनपाचे आयुक्तांच्या दलनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, मात्र पोलिसनाच्या सतरकतेमुळे आंदोलकांचा बेत फसला व मनसे च्या आक्रमक विद्यार्थी कार्यकत्याना पोलिसांनी वेळेवरच ताब्यात घेतले.

धुळे शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्या विरोधात कारावाई करण्याची मागणी धुळे शहर मनसे विद्यार्थी सेना कडून करण्यात आली होती, मात्र धुळे मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही, पालिके च्या दुर्लक्षामुळे आणि ढीम्या कारभार मुळे मनसेने आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याविरोधात हे आत्मदहनाचे आंदोलन आज करण्यात आले.