जनतेज न्युज

केंद्र सरकारने पारित केलेल्या शेती सुधारणा कायद्यांना विरोध करण्यासाठी मुंबईत काही शेतकरी संघटनांनी आंदोलन केले.

प्रतिनिधि , मुंबई : शेतकरी संघटनांनी रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते. पोलिसांनी या आंदोलनाच्या ठिकाणी बॅरेकेटींग करून आंदोलन कर्त्यांना थोपवून ठेवले होते.

केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. मुंबईत स्वाभिमानी शेतकरी, प्रहार आदी संघटना एकत्र आल्या आहेत.

या आंदोलनांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी कायद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक आंदोलकांनी डफली वाजवून या कायद्यांचा निषेध केला.

आंदोलक आक्रमक झाल्यानंतर, पोलिसांना त्यांना थोपवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हा मोर्चा रिलायन्स जिओच्या कार्यालयावर धडकणार होता. वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी, रविकांत तुपकर, बाबा आढाव, जयंत पाटील आदी शेतकरी नेते उपस्थित होते.