प्रतिनिधी , नागपुरात : नागपुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला ऍड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंब्यासोबतच विविध विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली. सोबतच आज सकाळी बच्चू कडू यांना आंदोलनात जाण्यापासून रोखण्यासाठी नागपीरात रोखण्यात आले होते या प्रशनाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले की मंत्र्यांना आंदोलनाचा अधिकार नसतो जर मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडू यांचा राजीनामाच घेतला असता.
