प्रतिनिधी , औरंगाबाद : ब्रिटनमध्ये आणि युकेमध्ये कोरोनाचा जुन्या पेक्षा नवा विषाणू वेगाने पसरत आहे त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणू चा पुन्हा कहर सुरू झाला आहे त्यामुळे राज्य शासनाने देखील विदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारनटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे औरंगाबाद शहरात ब्रिटनमधून एकूण नऊ नागरिक आले असून त्यातील सात जण शहरात आहे त्यापैकी पाच ब्रिटिश नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून बाकी दोन ब्रिटिश नागरिकांची कोरोना चाचणीचा अहवाल सायंकाळपर्यंत येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या आहे
कोरोनाचा नवा विषाणू जुना पेक्षा नवीन विषाणू वेगाने पसरत असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने औरंगाबाद विमानतळावरून माहिती मागवली 9 पैकी एक नागरिक औरंगाबाद विमानतळा वरून बुलढाणा येथे रवाना झाला तर दुसरा नागरिक वाळूज परिसरात राहत आहे तर उर्वरित सात नागरिक शहरात असल्याचे समोर आले
यावेळी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की शहरातील नागरिकांनी मास्क घालने आणि सोशल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे आहे हाताची स्वच्छता राखणे या गोष्टी पाळणे आवश्यक आहे
