शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहे त्या संविधानाच्या चौकटी मधल्या मागण्या आहे कारण कुठलाही कायदा होत असताना ज्यांच्यावर त्या कायद्याचा परिणाम होणार आहे त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून तो कायदा झाला पाहिजे : सुभाष लोमटे
प्रतिनिधी , औरंगाबाद : दिल्ली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज स्वराज्य अभियान आणि मराठवाडा लेबर युनियन तर्फे कष्टकऱ्यांचा मेळावा नारळीबाग येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सुभाष लोमटे म्हणाले की या मेळाव्याचा मुख्य उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या संविधानाच्या चौकटी मधल्या मागण्या आहे कुठलाही कायदा होत असताना त्यांच्यावर ज्या कायद्याचा परिणाम होणार आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तो कायदा केला पाहिजे तसेच केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे आणि 4 कामगार कायदे हे तातडीने रद्द करावी अशी मागणी सुभाष लोमटे यांनी केली आहे आणि कष्टकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देणे यासाठीचा संघटित मेळावा आयोजित केला होता
