जनतेज न्युज

अमेझॉनने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा यासाठी आज पंढरपूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

प्रतिनिधी , पंढरपूर ; मनसे आणि अमेझॉन हा वाद आता ग्रामीण भागातही पोहचलाय . मनसेच्या राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली अमेझॉनच्या बोर्डला काळे फासण्यात आलं. दोन दिवसात मराठी भाषेचा वापर न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी धोत्रे यांनी दिला. तसेच अमेझॉनच्या एकाही कर्मचाऱ्याला रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे पदाधिकाऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अमेझॉनला निवेदन देण्यात आलं.